शुभेच्छापत्रे
मातृदिन शुभेच्छापत्रे [Mothers Day – Marathi Greetings]
वर्गः: मातृदिन, शुभेच्छापत्रे
मे महिन्याचा दुसरा रविवार हा भारतामध्ये मातृदिन म्हणुन साजरा केला जातो.
आई तुझी आठवण येते;
सुखद स्मृतींच्या कल्लोळांनी काळीज का जळतेवात्स्ल्याचा कुठें उमाळा, तव हातांचा नसे जिव्हाळा
हृदयांचे मम होऊन पाणी, नयनीं दाटून येतेआई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळीज तिळतिळ तुटतेंहांक मारितो आई आई, चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हांक माउली, का नच कानीं येतेसुकल्या नयनीं नुरले पाणी, सुकल्या कंठीं उमटे वाणी
मुकें पाखरूं पहा मनाचें, जागीं तडफड करतेंनको जीव हा नकोच जगणें, आईवांचुन जीवन मरणें
एकदांच मज घेई जवळीं, पुसुनी लोचनें मातेंकवी – बाळ कोल्हटकर


आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो||
वर्गः: शुभेच्छापत्रे, आंबा
ऋतू आंब्याचा – फळांचा राजा आंबा. अशा हंगामात आपल्याला हे बालगीत नक्कीच आठवत असेल!
आंबा पिकतो, रस गळतो,
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो ॥धृ॥निळ्या आभाळी सांज सकाळी
जगताचा राजा रवी रंग फेकतो ॥१॥पाऊस वेळी ढगांच्या ओळी
थुई थुई पक्षीराजा मोर नाचतो ॥२॥आंब्याच्या वनी पानी लपुनी
उंच सुरांनी कोकिळ कुहूऽ बोलतो ॥३॥पायी पैंजण हाती टिपरी
कुंजवनी बाळराजा कृष्ण खेळतो ॥४॥


No comments:
Post a Comment