9th MAY 1866 - 19th FEBRUARY 1915 GOPAL KRISHNA GOKHALE
९ मई १८६६ - १९ फेब्रुअरी १९१५ गोपाल कृष्णा गोखले
Google वर gopal krishna gokhale साठी खरेदी करा
गोपाळ कृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखले | |
---|---|
![]() | |
जन्म: | मे ९, १८६६ कोल्हट, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र |
मृत्यू: | फेब्रुवारी १९, १९१५ मुंबई, महाराष्ट्र |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा |
संघटना: | भारत सेवक समाज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, डेक्कन एज्युकेशन सोसायटी |
प्रभावित: | मोहनदास करमचंद गांधी |
नामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत सेवक समाज या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते.
अनुक्रमणिका
[लपवा]बालपण[संपादन]
रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडीलबंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या वहिनींनी स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले.
शिक्षण[संपादन]
१८८४ मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी, १८८५ मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक करण्यात येणाऱ्या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.
राजकीय प्रवास[संपादन]
बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्विकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातीव्यवस्था निर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या माध्यमातून समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशाप्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या.
इ.स. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना इ.स. १९१९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचामसुदा तयार करण्यास सांगितले. त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले.
इ.स. १८८९ मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा काँग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. डिसेंबर, १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी काँग्रेसचे कार्य भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Society) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता.ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.
त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले.
न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत.
भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली. सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत.
‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे , असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले.
संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी निधन झाले.
सामाजिक सुधारणा[संपादन]
इ.स. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.
|
|
वर्ग:
- Pages using duplicate arguments in template calls
- भारतीय स्वातंत्र्यसैनिक
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- मराठी समाजसुधारक
- मराठी शिक्षणतज्ज्ञ
- पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
- इ.स. १८६६ मधील जन्म
- इ.स. १९१५ मधील मृत्यू
स्मरण आदर्श भारत सेवकाचे...
- अभय टिळक
- Feb 19, 2014, 00:08 AM IST
-
गोपाळ कृष्ण गोखले - विकिपीडिया
mr.wikipedia.org/wiki/गोपाळ_कृष्ण_गोखलेगोपाळ कृष्ण गोखले. Gopal krishan gokhale.jpg. जन्म: मे ९, १८६६ कोल्हट, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र. मृत्यू: फेब्रुवारी १९, १९१५आपण 5/9/15 रोजी या पृष्ठास भेट दिली.Gopal Krishna Gokhale - Wikipedia, the free encyclopedia
en.wikipedia.org/.../Gopal_Krishna_Go...या पानाचे भाषांतर कराGopal Krishna Gokhale CIE · About this sound pronunciation (help·info) (9 May 1866 – 19 February 1915) was one of the founding social and political leaders ...** 9th MAY 1866 - 19th FEBRUARY 1915 GOPAL KRISHNA ...
https://plus.google.com/.../posts/TqPSTxfdP5t२ तासांपूर्वी - 9th MAY 1866 - 19th FEBRUARY 1915 GOPAL KRISHNA GOKHALE ९ मई १८६६ - १९ फेब्रुअरी १९१५ गोपाल कृष्णा गोखले गोपाळ कृष्ण गोखले ...Gopal Krishna Gokhale Biography - Iloveindia
www.iloveindia.com › ... › Leadersया पानाचे भाषांतर कराHere is a brief biography and history of Gopal Krishna Gokhale. Read information on life of Indian freedom fighter Gopal Krishna Gokhale.आपण 5/9/15 रोजी या पृष्ठास भेट दिली.Gopal Krishna Gokhale - Cultural India
www.culturalindia.net › Leadersया पानाचे भाषांतर कराGopal Krishna Gokhale's contribution can be drawn from the fact that leaders like Mahatma Gandhi and Mohammad Ali Jinnah regarded him as their Guru.Gopalkrishna Gokhale - Live India . Com
www.liveindia.com/.../29.htmlया पानाचे भाषांतर कराBorn in Kothluk, a village in Maharashtra, on May 9, 1866, Gopal Krishna Gokhale was raised in the home of his maternal grandfather. This village was not too ...Gopal Krishna Gokhale - Encyclopedia.com
www.encyclopedia.com/.../Gopal_Kris...या पानाचे भाषांतर कराOn May 9, 1866, Gopal Krishna Gokhale was born in the Ratnagiri District of the Bombay Presidency into a poor but eminently respectable Chitapavan Brahmin ...आपण 5/9/15 रोजी या पृष्ठास भेट दिली.** 9th May 1866 - 19th February 1915 Shri Gopal Krishna ...
https://plus.google.com/.../KZs...या पानाचे भाषांतर करा१९ फेब्रु, २०१५ - 9th May 1866 - 19th February 1915 Shri Gopal Krishna Gokhale-Active Member Of Indian National Congress Gopal Krishna GokhaleFrom Wikipedia, the free ...Gopal Krishna Gokhale - Encyclopaedia Britannica
www.britannica.com/.../Gopal-Krishna-...या पानाचे भाषांतर कराGopal Krishna Gokhale, (born May 9, 1866, Ratnagiri district, India—died Feb. 19, 1915, Pune), social reformer who founded a sectarian organization to work for ...
-
No comments:
Post a Comment